Home Cities अमळनेर अमळनेर पं.स.सभापतींच्या पतीचा कोरोनाने मृत्यू,

अमळनेर पं.स.सभापतींच्या पतीचा कोरोनाने मृत्यू,

0
41

जळगाव प्रतिनिधी ।अमळनेर पंचायत समितीच्या सभापती रेखा पाटील यांचे पती नाटेश्‍वर बाबूलाल पाटील यांचा जळगाव येथील कोविड रुग्णालयात मृत्यू झाला.

मध्यंतरी नाटेश्‍वर पाटील (वय४८) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून उपचारानंतर त्यांना घरी रवाना करण्यात आले. मात्र, डिसर्च मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना जळगाव येथे नेण्यात आले. त्यांना जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.


Protected Content

Play sound