अमळनेर प्रतिनिधी । स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या अनुषंगाने आजादी का अमृत महोत्सव साजरा करताना असताना अमळनेर शहरांमध्ये अमळनेर नगर परिषदेमार्फत स्वच्छ नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज ही अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे.
यामध्ये अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, एनजीओ, नागरिक समूह, स्टार्ट अप कंपनी, शैक्षणिक संस्था,इत्यादी हे स्वच्छताविषयक वैशिष्टपूर्ण संकल्पना सादर करण्यासाठी सहभागी होऊ शकतात. या चॅलेंजनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करून स्वच्छता कार्यास सुधारणा घडवून आणणाऱ्या नव्या संकल्पनाची निर्मिती करणे आणि या स्वच्छता संकल्पनाचा अप्रत्यक्ष उपयोग समाज व शहर पातळीवर करणे हे उद्दिष्ट अमळनेर नगरपरिषदेने नजरेसमोर ठेवले आहे. या चॅलेंज मध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांकडून स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, 3R Reduce, Reuse and Recycle पुनर्वापर, सामाजिक समावेश इत्यादी चा संकल्पना समावेश असणे आवश्यक आहे.
अटी व शर्ती -स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कालावधी २९ डिसेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यत आहे. सर्वोत्तम तांत्रिक संकल्पना सादर करणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला नगर परिषद , अमळनेर मार्फत प्रशस्तीपत्र प्रदान केली जाणार आहेत. तसेच नगरपरिषदेच्या सोशल मीडिया वरून प्रसिद्ध केले जाईल. चॅलेंजमधील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या अभिनव संकल्पना राज्यस्तरावर चॅलेंजसाठी पाठविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर अंतिम निवड झाल्यास केंद्र सरकारमार्फत प्रकल्प अंमलबजावणीसाठी २५% रकमेचे सीड फंडिंग केले जाणार आहे. अमळनेर नगरपरिषद स्तरावरील चॅलेंज मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकातून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या निवडक स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे. स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज चे सर्व अधिकार व निर्णय नगर परिषद अमळनेर निर्णय राखून ठेवले आहेत.
सदर स्वच्छता विषयक नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्पाची माहिती अपलोड करण्याकरिता पूरक छायाचित्र तसेच छायाचित्रीकरण व्हिडिओ व पी PPT पावर पॉइंट प्रेझेंटेशन सदर अर्जासोबत सोबत अपलोड करावयाच्या आहेत. सदर स्पर्धेसाठी अधिक माहितीसाठी विजय सपकाळे मोबाईल ८९९९३४०१८२ व तसेच गणेश गढरी मो. क्रमांक ९४०३४५९२२४ किंवा आरोग्य विभाग, अमळनेर नगरपरिषद येथे संपर्क करावा. सदर स्वच्छता विषयक नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्पाची माहिती अपलोड करण्याकरिता पूरक छायाचित्र तसेच छायाचित्रीकरण व्हिडिओ व पी पी टी पावर पॉइंट प्रेझेंटेशन सदर अर्जासोबत सोबत अपलोड करावयाच्या आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी, एनजीओ, नागरिक समूह, स्टार्ट अप कंपनी, शैक्षणिक संस्था,इत्यादी यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन नगर परिषद अमळनेर चे अध्यक्षा कृषिभूषण जिजामाता सौ. पुष्पलता साहेबराव पाटील व प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद यांनी केले आहेत