अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काँग्रेसचे राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या सभेत स्वातंत्र्यविर सावरकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करून नागरीकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या निषेधार्थ अमळनेरात भाजपाच्या वतीने राहूल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेसचे राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. या दरम्यान एका जाहीर सभेत राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य केले. याचे पडसाद संपुर्ण राज्यात उमटत आहे. त्यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने अमळनेर भाजपा तालुका व शहर मंडल आणि युवा मोर्चा तसेच महिला मोर्चाच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप चौक येथे राहूल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार स्मिता वाघ, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, माजी सभापती श्याम आहिरे, सरचिटणीस जिजाबराव पाटील, राकेश पाटील, विजय राजपूत, जिल्हा ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष अजय केले, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील, शरद सोनवणे, मार्केट संचालक पराग पाटील, सदा बापू, महेश पाटील, दिलीप ठाकूर, चंद्रकांत कंखरे, मच्छिंद्र राजपूत, बापू हिंदुजा, शेखर कुलकर्णी, दिपक पवार, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी राजपूत, पंकज भोई, महिला मोर्चा अध्यक्ष छाया भामरे, युवा मोर्चा सरचिटणीस राहुल चौधरी, समाधान पाटील, महेश संदानशिव, गौरव सोनार, सागर शेटे, रवि ठाकुर, राहुल बडगुजर, निखिल धनगर आदी उपस्थित होते.