अमळनेर प्रतिनिधी | पतीने स्मार्टफोनमध्ये आपल्या पत्नीचे अश्लील चित्रण करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली असून यात त्याच्या घरच्यांनीही साथ दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मारवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेलमधील कळंबोली येथील प्रकाश शिंदे (मूळ रहिवासी- ममुराबाद, ता. जळगाव) यांचा मुलगा संतोष याच्याशी हिंगोणे खुर्द येथील तरुणीचा विवाह झाला होता. विवाहनंतर काही दिवसांनी या तरूणीला तिच्या सासरच्या मंडळीने त्रास देण्यास सुरुवात केली. यातच विवाहितेच्या पतीने आपल्याच पत्नीची स्मार्टफोनमध्ये अश्लील चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. माहेरून दहा लाख रूपये आण अथवा या क्लीप व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. यात त्याच्या घरच्यांनीही त्याला साथ दिली.
अखेरीस हा सर्व प्रकार थांबत नसल्याने पिडीत तरूणीने मारवड पोलीस स्थानकात पती संतोष प्रकाश शिंदे, सासू किरणावती शिंदे, नणंद सुरेखा कमलाकर पाटील व लहान नणंद उर्मिला निवृत्ती पाटील व नंदोई निवृत्ती पाटील (रा. औरंगाबाद) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.