अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नीम येथील लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राजेंद्र पाटील या ग्रामसेवकाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नीम ता. अमळनेर येथील ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील यांना काल ता.२३ रोजी विटाभट्टी साठी नाहरकत दाखल्याप्रकरणी २५ हजाराची लाच घेताना लाच लुचपत विभागाने पकडले होते. दरम्यान, संबंधीत ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांना अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस. बी.गायधनी यांनी तीन दिवस पोलीस कोठडी दिली. त्या कामी सरकारी वकील किशोर आर. बागुल यांनी युक्तिवाद केला. तसेच डि. वाय. एस. पी अँटिकरप्शन जळगाव शशिकांत पाटील यांनी देखील युक्तिवाद केला.