जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगांना दिली जाणारी मदत ही सामाजिक भावनेतून केली जात असून यात कृतज्ञता व विनम्रताही भावना आहे. दिव्यांगाने स्वतःतील सामर्थ्य ओळखून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास ही मोठी ताकद आहे. दिव्यांगांना मदत म्हणजे ईश्वरी सेवा असून दिव्यांगांना आनंदीमय जीवन जगता यावे यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. असे प्रतिपादन प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दर्जेदार प्रतीच्या सुमारे 125 इलेक्ट्रिक तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून मुंबई येथिल एच.डी.एफ.सी. बँकेचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट राघवेंद्र स्वामी, व्हा. प्रेसिडेंट अजीज गांधी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मंत्री गुलाबरावानी स्वतः इलेक्ट्रिक तीनचाकी सायकल चालवत स्वतः सादरीकरण (डेमो) केले.
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पाळधी येथिल सुगोकी लान येथे आयोजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल वितरण प्रसंगी केले. भव्य दिव्य अश्या सोहळ्याचे आयोजन व नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन व मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी “ मंजिल उन्हे को मिलती है जिसके सपनो मे जान होती है ! पंखो से कुछ नही होता हौसले से उडान होती है !! हिम्मत मत खोना अभी बहुत आगे जाना है !जिन्होने कहा था तेरे बस का नही, उन्हे भी करके दिखाना है !!” या शेरो शायरीने भाषणाची सुरुवात करून सांगितले की, ई – बाईकचा वापर व्यवसायासाठी प्रामाणिकपणे करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगानी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. येत्या 10 डिसेंबर पासून सरपंच व ग्रामंचायतींनी प्रत्येक गावात आभा कार्ड देण्यासाठी आयुष्यमान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले. एच.डी.एफ.सी. बँकेच्या सहकार्याने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून सी. एस.आर. फंडातून 2 कोटी 50 लक्ष किमतीच्या 500 इलेक्ट्रिक तीन चाकी सायकली मंजूर केल्या असून त्यापैकी आज 125 इलेक्ट्रिक तीन चाकी सायकलींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सायकलींची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली ही विशेष ! उर्वरित साहित्य पुढील टप्यात जळगाव तालुक्यात वितरित करण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तर मनोगतात मुंबई येथिल एच. डी. एफ. सी. बँकेचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट राघवेंद्र स्वामी यांनी मंत्री गुलाबराव पाटील व जि.प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सामाजिक कार्याचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः दिव्यांग व्यक्तींकडून समस्याही जाणून घेतल्या.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रम प्रसंगी मुंबई येथिल एचडीएफसी बँकेचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट राघवेंद्र स्वामी, व्हा. प्रेसिडेंट अजीज गांधी, सचिन भाटकर, खाजगी सचिव अशोक पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, संजय पाटील सर, गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, माजी सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर, दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, सरपंच संघटनेचे सचिन पवार, दामू अण्णा पाटील, भगवान पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, भानुदास विसावे, गोकुळ लंके, धनराज कासट, धीरेंद्र पुरभे, प्रिया इंगळे यांच्यासह तालुक्यातील सरपंच , उपसरपंच व सदस्य , दिव्यांग बांधव, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिव्यांग व्यक्तींना सायकल वाटपचे महत्व विशद करून 80% समाजकारण व 20% राजकारण , या शिवसेनेच्या ध्येय धोरणे प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. टप्या – टप्याने उर्वरित इलेक्ट्रिक तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात येणार असून त्यासाठी गरजू व पात्र व्यक्तींनीच लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रतापराव पाटील यांच्या प्रभावशाली भाषणाने उपस्थितांसह व्यासपीठावरील मान्यवरही भारावून गेले होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भूषण पाटील सर यांनी केले तर आभार भाऊसो गुलाबराव पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सोनवणे , अरुण पाटील यांनी मानले.