चोपडा प्रतिनिधी । कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, परंतु आपण सत्यावर ठाम राहिलेच पाहिजे. जर सत्यावर ठाम राहिले तर जीवनातल्या अनेक अडचणी दूर होतात. टिळक नेहमी सत्य बोलत होते, म्हणूनच आजही टिळकांना लोकमान्य पदवी मिळाली होती, असे मत जैन समाजातील अचलगच्छ संघाचे मोठे आचार्य भगवंत, परम उपकारी प.पु. गुरुदेव सागर यांनी केले. ते येथील शालिनीबाई पंडितराव देशमुख इंग्रजी मिडियम स्कुल बोलत होते.
ते अडावद-चोपडा रोडवर विहार करताना आज दि.27 डिसेंबर रोजी रात्रभर विश्रांतीसाठी शालिनीबाई पंडितराव देशमुख इंग्रजी मिडियम स्कुल येथे थांबले असता त्यांनी विद्यार्थ्यांना अवघ्या 10 मिनिटांच्या प्रवचनात वरील उद्गार काढले. त्यांनी अनेक उदाहरण देत मुलांना पटवून दिले की कोणत्याही खऱ्या संताला नतमस्तक व्हा, त्यांचे आचरण करा. त्यांनी दिलेली शिकवण आत्मसात करा, शालेय जीवनात शिक्षक सर्वात महान गुरू आहे. अश्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या.
यावेळी त्यांच्या सोबत दोन संत होते. तर प्रवचनात शाळेचे चेअरमन मनोहर देशमुख, प्राचार्य उमेश आर. महाजन, उज्वला कोतवाल, सुलोचना साळुंखे, रेखा नायदे, सपना वाघ, शितल इंगळे, जागृती वाघ, सुवर्णा पाटील, सपना वाघ तर चोपडा येथील पत्रकार लतीश जैन यांच्यासह आदी उपस्थितीत होते.