चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी तब्बल बावीस वर्षांनंतर एका छताखाली येत उत्साहात स्नेहमेळावा नुकतीच साजरा करण्यात आला.
तळेगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वीच्या बॕचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल २२ वर्षानंतर घेण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांच्या प्रतिमाला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व माल्यार्पन करून करण्यात आली. यावेळी स्वागत गीत माजी विद्यार्थी रेखा गोरे आणि माधवी देशमुख यांनी सादर केले. याप्रसंगी मंचावर माजी मुख्यध्यापक खोडगे, बाविस्कर, माळी, कोतकर, बागुल, वंदना निकम, एन.व्हि.देशमुख, किशोर शितोळे, शितोळे तात्या, भामरे विजु बापू, शरदनाना, बापु वाघचौरे आदी उपस्थित होते. दरम्यान त्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी शाळेची बेल, प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीत करण्यात आला.
यावेळी खोडगेंनी आज माझे ऊर भरुन आले आहे. तुमच्यातील ज्ञानरुपी भुक कधीच कमी न होऊ देता एक सुजान नागरीक बनावे. असे सांगितले तर इतर मान्यवरांनी देखील माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर माजी विद्यार्थी समाधान दराडे, अंजना सुळ, पांडुरंग चव्हाण, प्रियदर्शनी शितोळे, अविनाश वाघचौरे, प्रकाश आवारे , मनोज आहेर यांनी शाळेविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. तत्पुर्वी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिचय करुन दिला.
यानंतर माजी विद्यार्थ्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले .त्यामध्ये रेखा गोरे हिने “सत्यम शिवम सुंदरम”हे गीत सादर केले. माधवी देशमुख ,प्रियदर्शनी शितोळे, शुभांगी भामरे, संगिता लोहार, निलिमा जोशी यांनी “लाकुड तोड्या “या नाटकाचे सादरीकरण केले तर वाल्मिक शेलार, अविनाश वाघचौरे, मनोज आहेर, देविदास चित्ते, समाधान दराडे यांनी “पुढारी आप्पा”हि नाटीका सादर करुन जुन्या आठवणीनांऊजाळा दिला. यानंतर माजी विद्यार्थ्यांकडुन शाळेसाठी शैक्षणिक साहित्याची भेट देऊन शेवटी वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी विद्यार्थी वाल्मिक शेलार यांनी तर सुञसंचालन अनिल पगारे यांनी केले. आणि आभार समीर मोरे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थ्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी परिश्रम घेतला.