पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – गिरीश बापट आणि अंकुश काकडे यांची मैत्री सर्वांनाच माहित आहे. मी बापट असलो तरी पोपट आहे. चांगले लिहिण्यासह बोलतो देखील चांगले हे हॅशटॅग पुस्तकरूपाने समोर आले आहे. असे पुण्याचे खा. गिरीश बापट यांनी हॅशटॅग पुस्तक प्रकाशन प्रसंगी केले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे लिखित हॅशटॅग पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले यावेळी शरद पवार म्हणाले कि, राजकारणात मतभेद वैचारिक भिन्नता असते. या मतभेदांचे मनभेदात रुपांतर होऊ नये. राजकीय नेत्यांनी सुसंकृत भूमिका घेऊन आदर्श कार्य करावे असे पवार यांनी सांगितले.
अंकुश काकडे यांचे माझ्याशी मैत्रीपूर्ण संबंध असून काकडे यांचा राजकीय प्रवास शरद पवार यांच्या नेतृत्वात होईलच, पण राष्ट्रवादी कांग्रेसने काकडे यांना विधान परिषद आमदारपद देऊ नये. कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आहेत, तोपर्यंत काकडे विधान परिषदेवर निवडले जातील याची खात्री देता येत नाही असेही खा.गिरीश बापट यांनी यावेळी म्हटले.