जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून कुमारी माता केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षाची सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. श्रीमती जे.पी.दरेकर यांनी सुनावली आहे. विजय उर्फ टंकचंद ईश्वर खैरनार असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, एप्रिल 2015 च्या आधिच्या आठ महिन्यापुर्वी आरोपी विजय उर्फ टेकचंद ईश्वर खैरनार यांने त्याच्या भाड्याने राहत असलेल्या फिर्यादी अल्पवयीन पिडीत मुलगी घरात एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे पिडीत मुलगी गर्भवती होवून कुमारी माता होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात आरोपी विरोधात बालकांचे लैंगिक गुन्ह्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस 12 एप्रिल 2015 रोजी रामानंद पोलीसांनी अटक केली. त्याच्यावर असलेल्या गुन्ह्याचा तपासाधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक एस.एन.राजपूत यांनी दोषारोप पत्र दाखल केले. यात पिडीत मुलगी, डीएनए एक्सपर्ड, पंच, वैदयकिय अधिकारी आणि तपासाधिकारी असे एकून 11 साक्षिदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
जिल्हा सत्र न्यायालयातील न्या. श्रीमती जे.पी. दरेकर यांच्या न्यायालयात आज झालेल्या कामकाजात यात डीएनए एक्सपर्ड, पिडीतेचा जबाब व वैदयकीय अधिकारी याचा पुरावा ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवत दहा वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. शिला गोडंबे यांनी कामकाज केले.