अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्याप्रकरणी एकावर गुन्हा

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना 19 मे रोजी घडली असून याबाबत आईच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कानळदा येथील एका 17 वर्षीय मुलींला  भुषण सुनिल कोळी रा. भादुबा प्लॉट, कानळदा याने फुस लावून 19 मे रोजी रात्री 9 वाजता तिच्या घरात कोणीही नसतांना पळवून नेले. याबाबत अल्पवयीन मुलगीच्या आईच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्थानकात भुषण कोळी यांच्या विरोधात भाग 5, गुरनं 72/2019 भादवी कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास लालसिंग पाटील हे करीत आहे.

Add Comment

Protected Content