Home क्राईम अल्पवयीन मुलीवर लॉजवर दोघांकडून अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लॉजवर दोघांकडून अत्याचार

0
61

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका दहावीत शिकणाऱ्या मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पिडीत मुलगी ही दहावीत शिक्षण घेत आहे. दरम्यान २१ मार्च रोजी मुलीचा १० वीचा हिंदीचा पेपर सुटल्यावर गावातील संशयित आरोपी कृष्णा चौधरी आणि त्याचा मित्र बंटी (पुर्ण नाव माहित नाही) यांनी पिडीत मुलीला जबरदस्ती दुचाकीवर बसवून एका लॉजवर नेले तिथे तिच्यावर कृष्णा चौधरी याने अत्याचार केला. या अत्याचाराचे फोटो बंटी यांने काढले. दरम्यान, अत्याचाराचे फोटो व्हायरल केल्याचेही समोर आले आहे. हा प्रकार पिडीत मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कृष्णा चौधरी आणि त्याचा मित्र बंटी (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

 


Protected Content

Play sound