हॉकर्सचे व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यासाठी परवानगी द्या (व्हिडिओ )

जळगाव , प्रतिनिधी । आयुक्त साहेब हॉकर्स बांधवाचे दुकान लावू द्या अन्यथा त्यांच्या मुलांना दत्तक घ्या अशा घोषणा देत शिवसेनेच्यावतीने निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉकर्सचे दुकाने लावण्यासाठी महापालिकेवर मोर्चा काढून महापालिका आयुक्तांना निवेदन देत व्यवसायास परवानगी व जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

जळगाव शहरातील हॉकर्स आणि फेरिवाल्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. जे हॉकर्स, फेरिवाले पुर्वीपासून आपल्या व्यवसाय करीत असतांना त्यांच्यावर महापालिकाच्या अतिक्रमण विभागाने त्यांना वेठीस धरलेले आहे. गेल्या ६ महिन्यापासून कोविड-१९ च्या महामारी आजाराने सरकारचे नियम धरून आपले स्वतःचे व्यवसास बंद करून शासनाला व प्रशासनाल नेहमी सहकार्य केले आहे. त्यांच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी आता पैसेही उरलेली नाही. त्यामुळे त्यांना आपल्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी व्यवसाय, हाकर्सचे दुकान लावण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या काही जागा हाकर्स यांना व्यवसाय करण्याठी उपलब्ध करुन द्या अशी मागणी करण्यात आली.

जळगाव शहरातील हॉकर्स यांना जी. एस.ग्राऊड येथे व्यवसाय करू दिल्यास शहरातील सर्वच हॉकर्सचा प्रश्न मार्गी लागेल. जी.एस.ग्राऊंडची जागा ही जळगाव जिल्हापरिषद यांच्या मालकीची आहे. तरी आयुक्त यांनी या जागेसाठी पाठपूरावा करुन ती जागा हॉकर्स व्यवयासाठी उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती करून हॉकर्सवर होणारी कारवाई थांबवावी मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे निलेश पाटील, संजय कोल्हे, नंदू पाटील, रवींद्र मिश्रा, सुनील सैंदाणे, राहुल चौधरी, अविनाश जोशी, जगदीश भावसार, कैलास चौधरी, सचिन वानखेडे, विलास भदाणे, महेंद्र मांढरे, धोंडू बडगुजर, कैलास राजपूत, नरेश जोशी, विनोद चौधरी, ऋषिकेश पवार, सागर जगताप, हेमंत सोनार आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1208214296201670/

Protected Content