जळगाव प्रतिनिधी । ग्रामीणप्रमाणे शहरी भागातील शाळा सुरू करण्याची मागणी, जळगाव जिल्हा पालक संघटनेच्या वतीने मंगळवारी २५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, कोरोनामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून शाळा बंद होत्या. काही दिवसांपासून ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी परवानगी करण्यात आली आहे. परंतू त्यांच्या या आदेशामुळे शहरातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शहरातील विद्यार्थी दुकान, बँक, लग्न समारंभात जाऊ शकतो, बसमध्ये प्रवास करू शकतो मग शाळेत का जाऊ शकत नाही. वास्तविक शाळांमध्ये बाकांची व्यवस्था असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे प्रत्यक्षपणे पालन होत आहे. कोणत्याही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या मात्र खासगी शाळा खुलेआमपणे सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होतांना दिसून येत आहे.
नाशिक सारख्या अनेक जिल्ह्यात सर्व शाळा १०० टक्के सुरू करण्याचे आदेश निघाले आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील शहर भागातील शाळा किमान ५० टक्के क्षमतेच्या नियमाने सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा पालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मंगळवारी २५ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेम शामनाणी, उपाध्यक्ष निखील बिडकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.