चाळीसगावात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्या; अन्यथा आंदोलन !

चाळीसगाव प्रतिनिधी । बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळावी, अन्यथा, अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना व चाळीसगावच्या वतीने दि.११ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा निवेदनाप्रसंगी देण्यात आला असून आमदार मंगेश चव्हाण यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय समजला जाणारा बैलगाडा शर्यतीवरील बंदी राज्य सरकारने तातडीने उठवावी यासाठी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना व चाळीसगावच्या वतीने बुधवार रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांना याबाबतचा निवेदन दिले असता शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने केवळ शासन दरबारी यासाठी पाठपुरावा करून थांबणार नाही तर राज्यभरातील  बैलगाडा शर्यत चालक मालक व शर्यत शौकीन यांच्यावतीने आयोजित केलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे आश्वासित केले. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीच्या परंपरेवरील बंदी तात्काळ उठावावी यासाठी राज्य सरकार कडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवेदनाप्रसंगी १५० हुन अधिक बैलगाडा शर्यत चालक, मालक, शर्यत शौकीन उपस्थित होते.

 

 

Protected Content