जळगाव प्रतिनिधी । कुसुंबा येथील दाम्पत्याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन संशयित आरोपींना अटक केली होता. आज तिघांना न्यायालयात हजर केले असता १ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कुसुंबा येथील ओमसाईनगरातील अशाबाई मुरलीधर पाटिल या दाम्पत्याच्या खुनाचा उलगडा पाचव्या दिवशी स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने करत देविदास नामदेव श्रीनाथ (वय-४० रा. गुरूदत्त कॉलनी, कुसुंबा), अरुणाबाई गजानन वारंगे (वय-३०, रा.कुसुंबा ता.जि.जळगाव), सुधाकर राजमल पाटिल (वय-४५ रा. चिंचखेडा तपवन गावठाण ता. जामनेर) या तिघांना अटक केली होती.
घटना अशी आहे की, नवा कुसूंबा भागातील ओम साईनगरात वर्षभरा पुर्वीच घरबांधुन राहण्यास आलेल्या मुरलीधर राजाराम पाटिल (वय-५४) व त्याची पत्नी आशाबाई पाटिल (वय-४७) अशांचा बुधवार २१ एप्रिल रोजी राहत्या घरात या तिघांनी दोरीने गळा आवळून खुन करण्यात आला होता. मयत अरुणाबाई गेल्या अनेक वर्षांपासुन व्याजाचा धंदा करते, तीने नुकतेच दुमजली टोलेजंग घरबांधले असून तिच्या घरात बऱ्यापैकी रोकड आणि सोन्याचे दागिने मिळतील यांची खात्री असल्यानेच देविदास आणि अरुणाबाईने कट रचला. सोबतीला देविदासचा मित्र सुधाकर पाटिल याची मदत घेण्यात आली. अरुणाबाईचे घेणे असलेली रक्कमही द्यावी लागणार नाही आणि तिच्या घरातील घबाडातून हिस्साही मिळेल अशी लालसा अरुणाबाईला हेती. तर सुधाकर कर्जबाजारी झालेला होता. देविदास याला अर्थीक अडचण असल्याने तिघांनी तिचा काटा काढायचा निर्णय घेत बुधवार २१ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अगोदर मुरलीधर पाटिल याचा गच्चीवर गळा आवळला. तदनंतर आशाबाईला खाली घरात त्याच दोरीने गळफास देत ठार मारण्यात आल्याची कबुली संशयीतांनी दिली आहे.
देविदास नामदेव श्रीनाथ, अरुणाबाई गजानन वारंगे, सुधाकर राजमल पाटिल या तिघांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २६ एप्रिल रोजी पहाटे चिंचखेडा येथून अटक करण्यात आली होती. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता तिघांना १ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.