जळगाव, प्रतिनिधी | राजकारणात राहूनही जे सत्य आहे ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न उल्हास साबळे यांनी केले होते असे प्रतिपादन आ. सुरेश भोळे यांनी केले. ते स्व. उल्हास साबळे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली आयोजित सभेत बोलत होते. डॉ. ए. जी. भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस भवनात श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.
याप्रसंगी डॉ.उषा शर्मा, सुरेश सूर्यवंशी, उदय भालेराव, सरिता माळी, अनिल अडकमोल, उमाकांत वाणी, भाजपा मनपा गटनेते भगत बालाणी, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, बंडू काळे, गनिभाई मेमन, माजी उत्तमराव सपकाळे, राज्य उपाध्यक्ष युवक कॉंग्रेस भैय्यासाहेब पाटील, सलीमभाई पटेल, मनीष जैन यांनी मनोगत व्यक्त केले. आ. भोळे पुढे म्हणाले की, साबळे यांची इच्छाशक्ती मोठी असल्यानेच हृदयविकाराने ग्रासले असतांना त्यांनी विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत. माझे काही चुकत असेल तर ते आवर्जून सांगत असत अशी आठवण आ. भोळे यांनी सांगितली. प्रास्तविक डॉ. राधेश्याम चौधरी, यांनी तर सूत्रसंचालन श्याम तायडे यांनी केले. याप्रसंगी उल्हास साबळे यांचे चिरंजीव स्वप्नील साबळे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी ज्ञानेश्वर कोळी, प्रदीप सोनवणे, दीपक सोनवणे, मनोज चौधरी, देवा ठाकरे, शैलेश पाटील, सुरेश पांचाळ आदींनी कामकाज पहिले.