यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गिरडगाव येथील लोकनियुक्त सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले असून गाडर्या येथे फक्त सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.
बुधवारी ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. यात गिरडगाव ग्रामपंचायती च्या लोकनियुक्त सरपंचसह संपूर्ण सदस्य हे बिनविरोध विजयी झाले आहे .तर गाड्र्या ग्रामपंचायत चे सर्व नऊ सदस्य बिनविरोध झाले.माघारी नंतर तालुक्यातील लोकनियुक्त सरपंच सह एकुण २३ सदस्य बिनविरोध ठरले आहे तर लोकनियुक्त सरपंच च्या एकुण १० जागासाठी एकुण ३६ उमेदवार तर सदस्यांच्या एकुण ७७ जागे करीता १९४ उमेदवार रिंगणात आहे. माघारी नंतर चिन्ह वाटप झाले असुन ग्रामिण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारी माघारी करिता तहसील कार्यालया मध्ये प्रचंड गर्दी झाली होती.
यावल तालुक्यात १० ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रीक तर ९ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुक होत आहे. यात बुधवारी माघारीच्या दिवशी लोक नियुक्त सरपंच पदावरील १८ तर सदस्य पदाकरीता ५६ उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी गिरडगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सह संपुर्ण सदस्य तर गाड्र्या ग्रामपंचायतीचे सर्व ९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यासोबत म्हैसवाडी, किनगाव खुर्द,सावखेडा सिम, शिरागड या गावातुन एकुण २३ सदस्य बिनविरोध ठरले आहे तर आता एकुण १० लोकनियुक्त सरपंच पदा करीता ३६ उमेदवार रिंगणात असुन सदस्यांच्या एकुण ७७ जागे करीता १९४ उमेदवार रिंगणात आहेत. .म्हैसवाडी गावातुन काजल बाविस्कर,तुकाराम चौधरी, सपना चौधरी,मिना चौधरी हे चौघं तर किनगाव खुर्द स्वाती भुषण पाटील, सावखेडासिम मुस्तुफा तडवी, शिरागड रेखाबाई कोळी, बोराळे दिपाली चौधरी हे बिनविरोध ठरले आहे.
दरम्यान, बुधवारी माघारीच्या वेळे पर्यंत तहसिल कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती तर संपुर्ण प्रक्रीया तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी जी.टी. सोनवणे, सचिन जगताप, ए.वाय.बडगुजर, एम. पी. देवरे, एम.एच. तडवी, मीना तडवी, बबीता चौधरी,एस.एल.पाटील,एच. एन.तडवी,व्ही.डी.पाटील,एन.पी. वैराळकर, ए.एस.खैरनार, एस. आर.शेकोकार,के.पी.वायसे, सुयोग पाटील यांनी राबवली.
गिरडगाव ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूकीचा पायंडा यंदा देखील कायम राहिला येथे लोकनियुक्त सरपंच म्हणुन आशा हुसेन तडवी तर सदस्य म्हणुन रेहाना तडवी, किशोर पाटील, आशाबाई पाटील,शकीला तडवी,मोहीनी पाटील व प्रभाकर पाटील बिनविरोध ठरले. तर, तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत अतिदुर्गम भागात वसलेल्या आदिवासी गाड्र्या ग्रामपंचायतीचे काशिराम बारेला,शेवंती बारेला, सुलोचना बारेला,बिलवारसिंग बारेला,फुलसिंग बारेला,मीराबाई बारेला,शांताराम बारेला,लक्ष्मी बारेला,रमाबाई बारेला हे सदस्य बिनविरोध ठरले तर लोकसरपंच पदा करीता पाच उमेदवार रिंगणात आहे.
तालुक्यातील किनगाव खुर्द मध्ये बाजार समितीचे उपसभापती दगडू कोळी यांच्या पत्नी रूपाली दगडू कोळी सह हसिना गफुर तडवी व समीना शब्बीर तडवी यांच्या तिरंगी लढत रंगणार आहे. तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या तालुक्यातील साकळी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी ६१ अर्ज होते माघारनंतर अंतिम ४२ ग्रामपंचायत सदस्य निवडणूक रिंगणात असुन १९ अर्ज माघार घेण्यात आले.तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकुण सहा अर्ज होते. त्यापैकी चार अर्ज रिंगणात आहेत .जि.प. चे माजी आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांनी साकळी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांनी अर्ज माघार घेतला आहे त्यांच बरोबर साहेबराब मोतीराम बडगुजर यांनी सुद्धा लोकनियुक्त सरपंच पदाचा अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे साकळी ग्रामपंचायत लोकनियुक्ती सरपंच पदासाठी दिपक नागो पाटील, किरण मधुकर महाजन, सय्यद तय्यब सय्यद ताहेर, मनोज सुकलाल तेली, असे चार अर्ज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.