अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या पत्राचा लिलाव; मिळाले ३३ कोटी

न्यूयार्क-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अल्बर्ट आइनस्टाईन हे जगातले महान वैज्ञानिक होते यात काही शंकाच नाही. त्यांनी केलेलं कार्य हे तर मोठे आहेच शिवाय त्यांनी समाजाप्रति दिलेलं योगदानही तितकेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या एका पत्राचा लिलाव जेव्हा करण्यात आला त्या पत्राला ३३ कोटी रुपये किंमत मिळाली. त्यांच्याशी जोडली गेलेली प्रत्येक वस्तू ही खास आणि अमूल्य अशीच आहे याचाच प्रत्यय या लिलावाने दिला.

अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या एका पत्राचा लिलाव करण्यात आला. या पत्रावर अल्बर्ट आइनस्टाईन यांची सही होती. हे पत्र ३३ कोटी रुपयांना विकलं गेलं. अल्बर्ट आइनस्टाईन यांनी हे पत्र १९३९ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या रुझवेल्ट यांना लिहिलं होतं. या पत्रात अल्बर्ट आइनस्टाईन यांनी अणुबॉम्ब आणि त्याचा शस्त्र म्हणून होणारा वापर याबाबत इशारा दिला होता. या पत्रामुळे दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बच्या निर्मितीचा मार्ग खुला झाला असंही म्हणता येईल.

अल्बर्ट आइनस्टाईन यांनी लिहिलेल्या या पत्राची सोशल मीडियावर चर्चा आहे. या पत्रात अल्बर्ट आइनस्टाईन यांनी हा अंदाज वर्तवला होता की जर अणुबॉम्ब तयार करण्यात आला तर तो जगासाठी किती घातक ठरु शकतो. अल्बर्ट आइनस्टाईन यांचं हे पत्र न्यूयॉर्कच्या फ्रँकलिन डी. रुझवेल्ट वाचनालयाच्या संग्रहाचा एक भाग आहे. यामध्ये अल्बर्ट आइनस्टाईन यांनी जर्मनी अणुशक्तीचा वापर शस्त्रनिर्मितीसाठी करु शकते असं नमूद करण्यात आलं होतं. अल्बर्ट आइनस्टाईन लिहिलेल्या या पत्रामुळे त्या काळी सत्तेत असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अणुशक्तीचा शोध वेगाने करण्याबाबत निर्णय घेतला. यानंतर मॅनहॅटन या ठिकाणी हा प्रकल्प सुरु झाला. या प्रकल्पानेच जगाला अणुबॉम्बची ताकद काय ते दाखवलं.

बिझनेस इनसायडरच्या वृत्तानुसार अल्बर्ट आइनस्टाईन यांचे जे पत्र लिलावात विकण्यात आलं त्याची एकमेव प्रत होती. मायक्रोसॉफ्टचे सहससंस्थापक पॉल एलन यांच्या संग्रही ते होतं. जे २००२ मध्ये खरेदी करण्यात आलं. आता या पत्राचा लिलाव करण्यात आला आहे हे पत्र ३३ कोटींना विकण्यात आलं आहे. अल्बर्ट आइनस्टाईन यांनी या पत्रात रुझवेल्ट यांना अणुबॉम्ब किंवा तत्सम शस्त्रांबाबत सावध केलं होतं. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब हल्ला केला होता.

या पत्राचा लिलाव क्रिस्टीज या कंपनीने केला. या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पीटर क्लारनेट म्हणाले हे पत्र इतिहासातलं सर्वात महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण पत्र आहे. १९३९ च्या उन्हाळ्यात ते अल्बर्ट आइनस्टाईन यांनी लिहिलं होतं. पॉल एलन यांच्या आधी या पत्राचे पहिले मालक प्रकाशल मॅल्कम फोर्ब्स होते. महत्वाची बाब ही आहे की अल्बर्ट आइनस्टाईन यांनी हे पत्र लिहिलं. मात्र जेव्हा जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्बचा हल्ला करण्यात आला तेव्हा अल्बर्ट आइनस्टाईन यांनी या अणुबॉम्ब हल्ल्याबाबत तीव्र दिलगिरी व्यक्त केली होती. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

 

Protected Content