Home Cities अमळनेर अमळनेरच्या अक्षिता कोचरचे सीए परिक्षेत यश

अमळनेरच्या अक्षिता कोचरचे सीए परिक्षेत यश

0
38

अमळनेर प्रतिनिधी । नोव्हेंबर-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या सी ए (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षेत अमळनेर येथील कु अक्षिता धनराज कोचर हिने ८०० पैकी ४९१ गुण मिळवून दोन्ही ग्रुप मध्ये उल्लेखनीय यश मिळविले.

अमळनेर येथील होलसेल कापडाचे व्यापारी धनराज समीरमल कोचर यांची ती कन्या तर पुनम कोचर व खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष कमल कोचर यांची ती पुतणी आहे. विशेष म्हणजे पुणे शाखेमधून दुसर्‍या रँक मध्ये तीने मिळविली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound