अखिल कोष्टी महासंघची राष्ट्रीय कोअर कमिटीची बैठक उत्साहात

नशीराबाद प्रतिनिधी । अखिल कोष्टी महासंघाची राष्ट्रीय स्थरावरील कोअर कमिटीची तिसरी बैठक संपन्न झाली असून नशिराबाद येथे अखिल कोष्टी युवा फाऊंडेशनचे प्रशांत जी. खुंटे व अरुण कोष्टी यांनी आयोजित केली होती.

यामध्ये राष्ट्रीय कोर कमिटी संघाचे रजिस्ट्रेशन करणे त्याच बरोबर वधु-वर परिचय मेळावा आयोजित करणे  कोष्टी समाज जास्त प्रमाणात असलेल्या जिल्हयात भारत भर मिटिंगा आयोजित करणे ,सामाजिक पुरस्कार देणे ,समाजातील प्रत्येक जिल्ह्यात संस्था रजिस्ट्रेशन करणे ,सदस्य संख्या वाढवणे ,वार्षिक फी आकाराने , त्यात प्रामुख्याने महासंघाचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

ही बैठक राष्ट्रीय  अध्यक्ष किशोर बेलसरे, नासिक यांच्या आद्यक्षतेखाली पूर्ण करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष नरेन्द्र फिसके, अचलपूर, उपाद्यक्ष रविंद नादुरकर, उपाध्यक्ष रविंद्र घोडकर, सुरत, तसेच महासचिव अरुण  कोष्टी,जळगाव, महासचिव दिलीपभाऊ घोडकर, अकोला, महासचिव राम सदाफळे, अहमदाबाद, तसेच कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर बेलसरे, मुंबई,सह कोषाध्यक्ष पुरुषोत्तम खुंटे,आचेगाव,सह कोषाध्यक्ष दिलीपराव फिसके, अंजनगाव ,तसेच सहसचिव गजानन टापरे परतवाडा,सहसचिव श्रीराम मुगल अचलपूर,दीपकराव नांदुरकर, अहमदाबाद, सहसचिव दिपक काळबांडे,नशिराबाद असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या व्यतिरिक्त सभेला इतर सदस्य गण व जेष्ठ मान्यवर रमेशजी इसाने, रत्नाकरजी पांढरकर उपस्थित होते. बैठक हि राष्ट्रीय स्थरावर रजिष्टर करणे व समाज उन्नती विषयी चर्चा होवून त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.यावेळी नशीराबाद येथील पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content