अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने महापलिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आयुक्त सतिष कुळकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने महापालिकेतील कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात थकीत वेतन आणि सातवा वेतन आयोग मंजूरी दिल्यानंतर आजपर्यंत जळगाव महापालिकेतील कर्मचाऱ्या सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. जळगाव महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या सर्व शिक्षकांना ३ फेब्रवारी रोजी सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यास मंजूरी दिली आहे. परंतू महापालिकेच्या सफाई कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. सफाई कर्मचारी हा महापालिकेचा कर्मचारी असून त्याच्यावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे शिक्षकांप्रमाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. व विविध मागण्यांचे निवेदन आयुक्त सतिष कुळकर्णी यांना देण्यात आले.

 

याप्रसंगी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महामंत्री जयप्रकाश चांगरे, जितेंद्र चांगरे, दिलीप चांगरे, सुभाष चांगरे, अजय चांगरे, संजय चांगरे, सुनिल पवार, डिगंबर चांगरे, अरूण चांगरे, प्रमोद चांगरे, दिनेश करोसीया, दिनेश गोयर, नरेश जावळे यांच्यासह आदींनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला.

Protected Content