यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव बुद्रूक येथील श्रीराम मंदीरात बुधवार १७ पासून सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व संगीतमय श्रीराम चरीत मानस कथेचे आयोजन करण्यात आले आहे ११२ वर्षांची परम्परा असलेल्या या किर्तन सप्ताहात सकाळी ५ ते ६ काकड आरती तर सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ होणार असुन या किर्तनकार महाराजांची सेवा लाभणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पुढील प्रमाणे असणार आहेत. बुधवार १७ रोजी सकाळी १० ते १२ व रात्री ८ ते १० यावेळात ह.भ.प.गजानन महाराज आळंदीकर यांचे गुरूवार १८ रोजी रात्री ८ ते१० ह.भ.प.धर्मराज महाराज कासारखेडे १९ रोजी रात्री ८ ते १० ह.भ.प.समाधान महाराज रेंभोटा २० रोजी रात्री ८ ते १० ह.भ.प.दत्ता महाराज, भिवंडी २१ रोजी रात्री ८ ते १० ह.भ.प.आधार महाराज, पारोळा २२ रोजी रात्री ८ ते १ ह.भ.प.शशीकांत महाराज, भवरखेडा, २३ रोजी पहाटे ५ ते ७ ह.भ.प.योगेश्वर महाराज,वाघाडीकर व रात्री ८ ते १० ह.भ.प.शामसुंदर महाराज, शेंदुर्णीकर यांचे तर २४ रोजी रात्री ८ ते १० शामसुंदर महाराज, शेंदुर्णीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तर २४ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून दिंडी सोहळा होणार आहे तर सकाळी १० वाजेपासून महाप्रादाच्या कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या किर्तन सप्ताह दरम्यान दुपारी २.३० ते ६ यावेळेत संगीतमय श्रीराम चरीत मानस कथेचे वाचन ह.भ.प. दिपीकाताई देवळीकर या करणार आहेत या किर्तन सप्ताह दरम्यान मृदुंगाचार्य म्हणून दर्शन महाराज, नंदुरबारकर गायनाचार्य म्हणून तुषार महाराज, मालेगावकर व आदिनाथ महाराज यांची सेवा लाभणार आहे तरी पंचक्रोशीतील भक्त भाविकांनी या किर्तन सप्ताहाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदीर संस्थान किनगाव बुद्रूक यांनी केले आहे.