यावल-लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उंटावद येथील ओंकारेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दि.२० डिसेंबर पासून अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले असुन, या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन उंटावद ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील २५ वर्षाची अखंड परंपरा असलेल्या या हरिनाम संकिर्तन सप्ताहात सकाळी ५ ते ६ काकड आरती ६ वाजता मंदीर आरती सायंकाळी ५ ते६ हरीपाठ व रात्री ८ ते १० किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यात दि.२० रोजी ह. भ. प. उमेश महाराज, थोरगव्हाण (सावदा) २१ डिसेंबर रोजी ह.भ.प.मनोज महाराज, दुसखेडे २२ डिसेंबर रोजी ह. भ. प.सुभाष महाराज, भालोद २३ डिसेंबर रोजी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज, भुसावळ २४ डिसेंबर रोजी ह. भ. प. हेमंत महाराज, अडावदकर (भुसावळ) २५ डिसेंबर रोजी शिवव्याख्याते ह. भ. प. संजीव महाराज, गलवाडे २६ डिसेंबर रोजी ह. भ. प. विकास महाराज, खर्दे २७ डिसेंबर रोजी ह. भ. प. महंत प्रा. सुशिल महाराज, विटनेर यांच्या किर्तनाची सेवा लाभणार आहे तर २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम तर सायंकाळी ३ ते ७ वाजेपर्यंत दिंडी सोहळ्याने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
या संकिर्तन सप्ताहात गायणाचार्य म्हणून नारायण महाराज, शहादू महाराज, बाळू महाराज, योगेश महाराज, पिंटू महाराज, शाम महाराज, भगवान महाराज चिंचोली, एकनाथ महाराज पारगाव, साहेबराव महाराज कोळन्हावी, धर्मा महाराज आडगाव, मधु महाराज डोणगाव, लिलाधर महाराज किनगाव, रेवा महाराज डांभुर्णी, महेश महाराज, नरेश महाराज, श्रीराम महाराज, पंकज महाराज, हितेश महाराज उंटावद यांची सेवा लाभणार आहे तर विणेकरी म्हणून स्वप्निल पवार, ललित महाराज, विश्वेश महाराज, वैभव महाराज उंटावद मृदुंगाचार्य म्हणून आशिष महाराज उंटावद, विशाल महाराज, शिवदास महाराज आडगाव, प्रकाश महाराज किनगाव, दगडू महाराज धानोरा, हेमंत महाराज कोळन्हावी, संदीप महाराज पारगाव यांचे तर हार्मोनियम वादक म्हणून भोजराज महाराज व त्यांचे सहकारी यांचे सहकार्ये लाभणार आहे तरी या अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाचा सर्व भावीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे