बापरे : आकाशवाणी चौकात मोटारसायकल स्वाराला टँकरने चिरडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठकीसाठी दुचाकीवर येणारे बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथील सचिव पंजाबराव बोरसे यांना भरधाव गॅस‍ सिलेंडर घेवून जाणाऱ्या ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातवेाईकांनी मनहेलवणार आक्रोश केला होता.

 

जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (क्र. एमएच १९, एसी २२४) जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात पोहचले त्या वेळी तेथे मागून गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ०४ जेयु ९५९६) त्यांना धडक दिली. यात बोरसे चाकाखाली आले व त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तेथे धाव घेतली व पोलिसही तेथे पोहचले. त्यांनी रुग्णावाहिका मागवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. घरातील कर्ता पुरूष गेल्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Protected Content