पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या सूडाच्या राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत,’ असे जावेद शेख यांनी म्हटले आहे. शेख यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता अजित पवारांचे समर्थन करण्यासाठी पक्षातील इतर नेते राजीनामा देतील, अशा चर्चेला सुरुवात झाली आहे.