मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत.
आज दुपारी राजभवनात मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. यात अजित पवार यांच्यासह सहकार्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात अजित पवार यांनी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दरम्यान, याआधी दिवसभरात मोठ्या घडामोडी झाल्या. अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाल्यानंतर ते आपल्या सहकार्यांसह थेट राजभवनाकडे निघाले. यानंतर शपथविधी सुरू झाला.