बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे यांनी आज २० मार्च बुधवार रोजी आपल्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी संध्याकाळी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामूळे अजित पवार यांना बीड जिल्हयात मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बजरंग सोनवणे यांचे स्वागत केले.
मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करतोय. तसं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होतो. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मी प्रवेश करतोय. मी जास्त काही सांगणार नाही. पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेस तालुक्याध्यक्ष मी होतो. बऱ्याच जणांना ते माहिती नसेल. बरेचजण माझा इतिहास शोधताना मी भाजपमधून आलो असं म्हणतील. पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी तालुकाध्यक्ष होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या विचारांबरोबर मी काम केलं आहे, असे यावेळी बजरंग सोनवणे म्हणाले.