मुंबई (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोघं जण आज मुंबईत भेट होणार असून या भेटीनंतर अजित पवार माध्यमांसमोर येणार असल्याचे कळते.
अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. त्यानंतर ते अज्ञातवासात गेले होते. मात्र आता अजित पवार यांनी फोनवरून शरद पवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला तुम्हाला भेटायचे आहे, असे शरद पवारांना सांगितले. त्यावर शरद पवारांनी मुंबईत भेटू असे कळवल्याची माहिती आहे. त्यामुळे आज अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्याची भेट होणार आहे.