यावल प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दि. 22 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते माजी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी, जिल्हा परिषदच्या शाळामध्ये गरीब विद्यार्थ्यांना बिस्किट व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याचबरोबर, सातोद रोडवरील जिल्हा परिषदेच्या मराठी मुला मुलींची शाळा व जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा आणि उर्दू मुलांची शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ बिस्कीट वाटण्यात आले. तसेच प्रा. मुकेश येवले व पक्षाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, दिनू पाटील, नाना बोदडे, राष्ट्रवादी आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम.बी.तडवी, भास्करराव पाटील, भैय्या पाटील, युवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवकांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष अकबर खाटीक राकाँचे शहराध्यक्ष करीम भाई मन्यार, महिला अध्यक्ष व्दारका पाटील, सुरेखा पारधे, रईसाबी खाटीक कामराज घारू, ओ.बी.सी सेलचे निवृत्ती धांडे, विजय साळी, नाना कोळी, निलेश बेलदार, राहुल गजरे, अरुण पाटील, ललित पाटील, शिवराम वैदू, राहुल गजरे अतुल बडगुजर, हितेश गजरे, अरुण लोखंडे, उर्दू शाळेचे शोख सर, खान मॅडम, मराठी शाळेचे मेढे सर, गजरे मॅडम आदी उपस्थितीत होते.