अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसऱ्यांदा नियुक्ती

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नव्या सरकारला मतदारांनी कौल दिल्यानंतर आणि मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर प्रमुख पदांवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा एकदा अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. डोवाल यांच्याशिवाय पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरही पुन्हा एकदा पी.के.मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार अजित डोवाल आणि पी.के.मिश्रा यांचा कार्यकाळ सध्याचे पंतप्रधान हे पदावर असेपर्यंत असणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने निवृत्ती पोलीस अधिकारी अजित डोवाल यांची 10 जून 2024 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत किंवा सध्याचे पंतप्रधान पदावर असेपर्यंत डोवाल हे या पदावर असतील असे आदेशात म्हटले आहे. पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झालेल्या अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळेल. त्यांच्या अटी, शर्तींबाबत वेगळे सूचनापत्र जारी केले जाईल.

Protected Content