Home Cities जळगाव अजिंठा लेणी धम्ममय ! : २० वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद...

अजिंठा लेणी धम्ममय ! : २० वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अजिंठा लेणी येथे ५ नोव्हेंबर रोजी भव्य अशा २० व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेसाठी देशभरातून बौद्ध बांधव हजारोंच्या संख्येने एकत्र आले होते. या महत्त्वपूर्ण धम्म परिषदेत कोरियाचे माजी गव्हर्नर तसेच शेकडो कोरियन बौद्ध भिक्षू विशेष उपस्थित राहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध एकात्मतेचे दर्शन घडवणाऱ्या या परिषदेत भव्य धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या पवित्र प्रसंगी सकल बौद्ध समाज जळगाव जिल्ह्यातर्फे अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. हजारो उपस्थितांना अन्नदानासोबत केळी आणि पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. जळगाव येथून मोठ्या संख्येने समाजबांधवांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. बौद्ध धर्मातील “दान” परंपरेचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

या अन्नदान कार्यक्रमात बुद्धिस्ट क्रिकेट लीग (बीसीएल) जळगाव चे पदाधिकारी तसेच सकल बौद्ध समाजाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे, माजी अध्यक्ष तथा आजाद पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, सचिव तुषार सोनवणे, कोषाध्यक्ष सचिन सरकटे, राजू डोंगरे, भारती रंगे, नीलू इंगळे, सागर अभिजीत रंधे, विक्रम रंधे, हरिओम सूर्यवंशी, गौरव गायकवाड, अहिरे सर आणि इतर समाज बांधवांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound