जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील देव्हारी येथील दाम्पत्य दुचाकीने औरंगाबाद येथे लग्नासाठी जात असतांना अज्ञात आयशर ट्रकने मागून येवून कट मारल्याने दुचाकीवील दाम्पत्य जखमी झाले. दोघांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र शांताराम लुले (वय-30), प्रतिभा रविंद्र लुले (वय-28) रा.देव्हारी ता. जळगाव हे दाम्पत्य आपल्या लहान मुलासह दुचाकीने औरंगाबाद येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी जात असतांना भवानी फाट्याजवळ मागून अज्ञात आयशर गाडीने कट मारून पसार झाला. दुचाकीला कट मारल्याने मुलासह दोघेजण दुचाकीवरून रोडच्या बाजूला पडले. यात लहान मुलाला किरकोळ जखमी झाला असून दोघे पती-पत्नी जखमी झाले. दोघांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.