कोझीकोडे वृत्तसंस्था । येथील विमानतळावर एयर इंडियाने विमान घसरून पडले असून यात वैमानिकाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. हे विमान रनवे वरून घसरलं असून विमानाला मोठ नुकसान झालं आहे. या विमानात १७० प्रवासी होते. दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. आई एक्स १३४४ हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. मवंदे भारत मिशनफच्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होतं. दरम्यान, या अपघातामध्ये या विमानाचा पायलट मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. तर, यात अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते.