नव्या संकल्पनासह काळानुसार बदलत प्रगती साधण्याचे उद्धिष्ट- मुख्यमंत्री

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | सर्वांना गाडी घेत प्रवास करणे शक्य नाही. अशावेळी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी सेवा देण्याचे कार्य एसटी करत आहे. भविष्य घडवण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असून, नव्या संकल्पना आणि काळानुसार आपणही बदलत प्रगती कऱण्याचे उद्धिष्ट असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यासह देशाच्या भवितव्याला जपणाऱ्या, महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाला, दिवसाला, क्षेत्रात एसटीचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने राज्यातील पहिल्या विद्युत प्रणालीवरील इलेक्ट्रिक एसटी बसचे ऑनलाइन उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बसेसचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.
ते पुढे म्हणाले कि, पुणे ते अहमदनगर मार्गावर ही इलेक्ट्रिक एसटी बस बस धावणार असून करोना काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पराक्रमच केला असून गेल्या वर्षीचा मधील काळ सर्वांसाठी वेदनादायी होता. त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊच शकत नाही. समोर धोके असतानाही त्यांनी काम केले. तसेच एसटीचे फक्त कर्मचारी म्हणून नाही तर कुटुंबाचे सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहतो. खासगी बसेसच्या बरोबरीने तिकीट दर ठेवले तर एसटीचा फायदा काय? त्यामुळे आपल्याला साहजिकपणे तोटा सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच आम्ही त्यावेळी जे शक्य आहे ते करणार, पण आपण आपल्या राज्याचे वैभव असल्याचेही भान तुम्ही ठेवा, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

Protected Content