पाचोरा प्रतिनिधी । येथील कृष्णापुरी भागातील नदीपात्रात अचानक पाणी लागले आहे.
याबाबत माहिती अशी की, नगरपालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटारीचे काम सुरू असून, हे काम शहरांमध्ये 50 टक्के पूर्ण झाले आहे. कृष्णापुरी भागात भुयारी गटारीची पाईप लाईन टाकण्यासाठी नदी साइटवर जेसीबी व पोकलेन खोदकाम सुरू असल्याने या नदीपात्राच्या खडकावर खोदकाम करत असताना अचानक पाण्याची मोठी धार उडताना दिसून आली. तर यावेळी उपस्थितींचे म्हणणे होते की, याठिकाणी कदाचित पाईपलाईन फुटली असावी, म्हणून पाण्याची धार लागली असावी. मात्र कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यास, नदीच्या जमिनीतूनच पाणी लागल्याचे यावेळी दिसून आले. कृष्णापुरी परिसरात पाच पांडव देवतांचे अस्तित्व असल्याचे जुना इतिहासात बोलले जात असून त्याचा चमत्कार असल्याचे बोलले जात आहे.