चाळीसगाव (प्रतिनिधी) राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 वी जयंती निमित्ताने मल्हार सेना व धनगर समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावर्षी पुजेचा मान भगवान महादू साबळे यांना मिळाला. आज सकाळी श्री.साबळे यांनी सहपत्नीक आहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत पूजन केले.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 वी जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास धनगरसमाज अध्यक्ष पोपटनिंबा आगोणे, रमेश जानराव उत्सव समितीचे अध्यक्ष पांडुरंग बोराडे, उपाध्यक्ष रवींद्र आगोणे, सचिव योगेश साबळे, उपसचिव मच्छिंद्र आगोणे, सदस्य माजीनगरसेवक बाळासाहेब आगोणे, ॲड कैलास आगोने, देवीदास आगोणे, पांडुरंग आगोने, गुलाब आगोने, साहेबराव आगोने, एकनाथ आगोणे, दिलीप आगोणे, ॲड खंडू कोर, बापु सोनवणे, संतोष आगोणे, भिला कारभारी, गोविंदा आगोणे, प्रल्हाद आगोणे, बापू लेणेकर, गणेश साबळे, निवृत्ती आगोणे, विजू आगोणे, महादु आगोणे, खुशाल रावते, शिवाजी आगोणे, सोपान आगोणे, भगवान सोनवणे, दिनेश साबळे, हितेश साबळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.