पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । एसडीएमव्हीएम कृषी महाविद्यालय गेवराई तांडा, औरंगाबाद येथील कृषिदूत धीरज सिल्लोडकर यांनी जामनेर तालुक्यात ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असून कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थी सध्या जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तज्ञांच्या सल्ल्याने मार्गदर्शन करत आहे.
या कार्यक्रमांतर्गत धीरज सिल्लोडकर हे जनावरांचे लसीकरण, माती परीक्षण, कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन तसेच विविध मोबाईल ॲपच्या माध्यमातून रोग व कीड कशी ओळखावी याचे मार्गदर्शन कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर येथे जाऊन बाजार भाव यांचे प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैद्य, प्रा. शेलार, प्रा सोनवणे, प्रा. मुंगीलवार यांचे मार्गदर्शन मिळत आहे.यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.