मुक्ताईनगर, प्रतिनिधी |कृषी महाविद्यालय मुक्ताईनगरच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमामध्ये कृषिदूतांनी फेरोमन ट्रॅप [कामगंध सापळे] लावण्याचे प्रात्यक्षिक तसेच गुलाबी बोंड अळी बद्द्ल शेतकऱ्यांना माहिती दिली.
यात फेरोमन ट्रॅपचा वापराचे महत्व कृषी दूतांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. पिकांवर येणाऱ्या किड्यांपासून पिकाच्या संरक्षणाचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले. या वेळी कृषिदूत संतोष बिराजदार, तेजस शेटके, कुलदीप पाटील, शिवराज मुळीक उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासाठी कार्यक्रम अधिकारी कुलदीप पाटील,चेअरमन चव्हाण, व प्रा. लोलगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत गावात दाखल झालेल्या कृषी दुतांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी व्यवहारे आणि सुमेटोमो कंपनीचे प्रतिनिधी उमेश पवार हे उपस्थित होते. उमेश पवार यांनी कपाशीवरील गुलाबी बोंड अळी आणि मक्यावरील लष्करी अळीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतकऱ्यांना शासकीय योजनांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रवीण महाजन होते. कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले कृषिदुत संतोष बिराजदार, तेजस शेटके, शिवराज मुळीक आणि कुलदीप पाटील