यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील अट्रावल येथील नवसाला पावणाऱ्या जागृत मुंजोबा देवस्थानाने काल मध्यरात्री अग्नीडाग घेतला. संपुर्ण महाराष्ट्रसह मध्यप्रदेश गुजरातमध्येही प्रसिद्ध असलेल्या व नवसाला पावणाऱ्या या देवस्थानाच्या दर्शनासाठी ९ फेब्रवारीपासुन ही यात्रा माघ शुद्ध अमावस्या ते माघ शुद्ध पौर्णिमेपर्यंत सालाबादप्रमाणे भरत असते.
या यात्रेत येणाऱ्या भाविकांमध्ये लहान मुलांचे जाऊळ देणे, नवस मानणे, नवस फेडणे, असे धार्मीक विधी पार पाडले जातात. यात पुजेसाठी भाविकाकडुन दर्शन नंतर नारळ व नारळाचे काढलेले सालटे या ठिकाणी टाकलेले असतात. या मुंजोबांच्या गाभाऱ्यात टाकलेल्या नारळांनी काल (दि. ४ मे) यात्रेच्या ९० दिवसांनंतर मध्यरात्री पेट घेतला आणि मुंबोजाने दरवर्षाप्रमाणे अग्नीडाग घेतला आहे. मुंजोबाने अग्नीडाग घेतल्यानंतर मुंजोबा देवस्थानच्या विश्वतांनी लोकसभागातुन महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.