यावल येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील दुसखेडा, कासवासह परिसरातील सुमारे विस गावांशी संपर्क जोडणारा अकलुद ते दुसखेडा रस्त्याचे मंजुर झालेले काम मागील  तिन वर्षा पासुन अर्धवट अवस्थेत पडून असल्याने नागरीकांना या खराब झालेल्या रस्त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असुन, निंद्र अवस्थेत असलेल्या प्रशासनास जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अकलुद, दुसखेडा व परिसरातील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यावल कार्यालया समोर ठीय्या आंदोलन करणार आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, तालुका सरचिटणीस विनोद पाटील पदधिकारी यांच्यासह दुसखेडा तालुका यावल ग्राम पंचायतचे सरपंच ,वढोदे प्रगणे यावल सरपंच , कासवा तालुका यावल ग्रामपंचायत सरपंच यांच्यासह मोठया संख्येत या परिसरातील ग्रामस्थ मंडळींनी यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दुसखेडा ते अकलुद फाटा ( राष्ट्रीय मार्ग क्रमांक४ रस्ता प्रतिम१४ ) हा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षापासुन मंजुर झालेला असुन रस्त्याचे काम अद्याप अपुर्ण व अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन वारंवार वाहनांचे अपघात या रस्त्यावर होत असुन, त्यामुळे या रस्त्याशी जुडलेल्या सुमारे विस गावांच्या ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असुन, ग्रामस्थांच्या या गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व या अर्धवट कामास पुर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, विविध गांवांचे सरपंच व मोठया संख्येत ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम यावल च्या कार्यालया समोर दिनांक २७ डिसेंबर र०२३ रोजी ठीय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

या बाबत यावल कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर परिसरातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच व असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत .

Protected Content