एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेचे आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या निषेधार्थ महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने जळगाव विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली.

कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत चौधरी आणि सचिव विलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. 2016 ते 2020 च्या वेतनवाढीचा फरक, घरभाडे भत्ता फरक आणि महागाई भत्त्यातील वाढीचा फरक यांसारख्या थकीत देण्यांसाठी वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत.

मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे आणि सरचिटणीस हणमंत ताटे यांनी 5 मार्च 2025 रोजी राज्यव्यापी निदर्शनांचा निर्णय घेतला. त्यानुसार, जळगाव विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष प्रशांत चौधरी, सचिव विलास सोनवणे, कार्याध्यक्ष मोहन बिडकर, योगेश सपकाळे, विकास पाटील, प्रदीप दारकोंडे, सारनाथ जोहरे, गोकुळ पाटील, राजेश साळवे, सतीश वंजारी, लीलाधर चौधरी, अविनाश सोनवणे, रणजित सोनवणे आणि सुरेश जयस्वाल यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी राजू पारधी, गौरव जोशी, भीमराव पवार यांच्यासह महिला कर्मचारी अर्चना सोनवणे, हर्षा सरोदे, अर्चना पाटील, भांडार विभागाचे संदीप बाविस्कर आणि श्रीपाद ब्रम्हक्षत्रिय यांनी विशेष सहकार्य केले.

Protected Content