जळगाव, प्रतिनिधी | अग्रवाल समाजातील जिल्हा आणि राज्यस्तरीय पातळीवरील महिलांचे जिल्हास्तरीय अधिवेशन २०१९ आणि आमसभा राज्य अग्रवाल महिला संमेलनातर्फे घेण्यात येत आहे. रविवारी १७ रोजी एमआयडीसी येथील दादलिका फार्म येथे अधिवेशन आयोजन करण्यात आले आहे.
अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशन संचलित राज्य अग्रवाल महिला संमेलनतर्फे जळगावात प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. सकाळी उद्घाटन १० वाजता उद्योजक संजय दादलिका आणि सरिता दादलिका यांच्या हस्ते होणार असून यावेळी औरंगाबाद येथील प्रांत अध्यक्ष मालती गुप्ता, अकोला येथून प्रांत महामंत्री उषा अग्रवाल, धुळे येथील मीना अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती आहे. दुपारील सत्रात आमसभा होणार असून यावेळी विविध सामाजिक विषयांवर चर्चा घडून येणार आहे. यात महिलांच्या प्रश्नावर मंथन होणार आहे. समाजातील महिलांना उपस्थितीचे आवाहन खानदेश विभागीय अध्यक्षा मीनल अग्रवाल, जिल्हाध्यक्ष रेखा अग्रवाल, उपाध्यक्ष उर्मिला अग्रवाल, महामंत्री लता गोयल, कोषाध्यक्ष वर्षा अग्रवाल यांनी केले आहे.