चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विविध गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांतर्गत खेडगाव, बहाळ, न्हावे, ढोमने, तरवाडेसह इतर भागाला जोडणारे रस्ते आमदार असतांनाच्या काळात केले. येणाऱ्या काळात तालुक्याला एका वेगळ्या दिशेने नेण्यासाठी भाजपा आणि महायुती सदैव प्रयत्नशील राहिल, असे प्रतिपादन खा.उन्मेश पाटील यांनी केले.
चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी भाजपाचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित तालुक्यातील खेडगाव-बहाळ गटाच्या विजय संकल्प मेळाव्यात बहाळ येथे केले. यावेळी बहाळ ग्रामस्थांच्या वतीने मंगेश चव्हाण व उन्मेष पाटील यांची घोड्यावरून बसून जंगी मिरवणूक काढण्यात येऊन ढोल ताशांच्या गजरात घराघरात विजयतीलक लावण्यात आले. शुक्रवारी सकाळ पासून कोदगाव, बेलदार वाडी, गणपुर गाव व तांडा, रामवाडी, चितेगाव, पिंप्री ब्रू., गणेशपुर, शिंदी, ओढरे, विष्णुनगर, खडकी ब्रु., खरजई, तरवाडे येथून प्रचार दौरा करत बहाळ येथे विजय संकल्प मेळाव्यात या दिवासाच्या प्रचार दौऱ्याची सांगता करण्यात आली.
एसी मध्ये जन्मलेल्या लोकांना गरिबी कळणार नाही – मंगेश चव्हाण
मंगेश चव्हाण मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने काही लोक भाजपाच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणे, मारहाण करीत आहे. परंतु तुम्ही आमच्या माणसाला मारू शकता आमच्या विकसनशील विचारांना नाही. सामान्य जनतेला गुंडगिरी प्रवृत्ती असलेला माणूस नकोय आणि ते त्याची प्रचिती मतदान रुपात देतीलच. एसी मध्ये जन्मलेल्या लोकांना गरिबी कळणार नाही. ती कळण्यासाठी परिस्थितीचे चटके सोसलेला माणूसच लागतो, मी लहानपणापासूनच हे चटके सोसत आलेलो आहे. म्हणून कोणावरही मी अन्याय होऊ देणार नाही. येणाऱ्या काळात तालुक्याच्या विकासाची जे जे योग्य आहे ते ते आपण तालुक्यात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. त्यासाठी आपणा सर्वांची साथ हवी आहे. तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा आपण सर्व मिळून या तालुक्याला सुजलाम सुफलाम करू असे प्रतिपादन त्यांनी विजय संकल्प मेळाव्यात सांगितले.
सात बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर मार्गी – खासदार उन्मेश पाटील
पुढे खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, जे लोक महात्मा फुले यांच्या नावाने मत मागतात त्यांनी महात्मा फुले यांची अस्मिता जोपासण्यासाठी कुठली पाऊले उचलली. भाजपाच्या काळात महात्मा फुले यांच्या नावाने ट्रामा केअर सेंटर चे लोकार्पण करून त्यांची अस्मिता जोपासण्याचे काम आम्ही केलेले आहे. येणाऱ्या काळात या शिवारातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाण्याची सोय व्हावी यासाठी भाजपाच्या माध्यमातून सात बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावले जाईल. एकेकाळी प्रत्येक घराघरात सतत खंडित होणारा वीज पुरवठा आम्ही नियमित सुरू केला, येणाऱ्या काळात आता शेतातील वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात उत्तम कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांचे हात पुन्हा बळकट करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
के.बी. साळुंखे, शिवसेनेचे महेंद्र बापू, संजय पाटील, यु. डी.माळी सर, राजेंद्र चौधरी, पोपट तात्या भोळे यांनी आपल्या मनोगतात मंगेश चव्हाण यांच्या कार्याची माहिती देत त्यांना आधिकाधिक मतांनी विजयी करा असे आवाहन केले, तर जळकेकर महाराजांनी आपल्या अध्यात्मिक शैलीत “प्रतिभा” संपन्न “मंगेश” व “संपदा” संपन्न “उन्मेष” यांची कार्याची ख्याती मांडत ज्याने गरीब जनतेला पंढरी दाखवली त्याला आपण राजकारणाची पंढरी मतदानाच्या रुपात दाखवा, असे आपल्या शैलीत मांडत उपस्थितीत जनतेकडून टाळ्यांची दाद मिळवली.
या मेळाव्याला शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, तालुका अध्यक्ष के.बी. साळुंखे, मार्केट कमिटी सभापती रवी पाटील, पं.स. सभापती स्मितलताई बोरसे, उपसभापती संजू तात्या पाटील, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद खरात, ज्येष्ठ नगरसेवक राजू चौधरी, यु.डी.माळी, उपसभापती कृउबा महेंद्र पाटील, शिवसेना तालुका प्रमुख नाना कुमावत, माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी जि.प.सदस्य शेषराव पाटील, जिल्हा नियोजन सदस्य धर्मा वाघ, गटनेते संजू पाटील, किशोर पाटील ढोमणेकर, माजी पं.स.सदस्य जगन महाजन, दिनेश बोरसे, रवींद्र चौधरी, रमेश सोनवणे, जि.प.सदस्य भाऊसाहेब जाधव, अनिल गायकवाड, पं.स.सदस्य पियुष साळुंखे, मार्केट संचालक सरदार शेठ राजपूत, अलकनंदाताई भवर, विश्वजीत पाटील, स्वप्निल मोरे, सुभाष पहिलवान, राजेंद्र पाटील, नगरसेविका विजया पवार, तुकाराम गवळी, सरचिटणीस सुनील निकम, धनंजय मांडोळे, अनिल नागरे, तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, वाय आर सोनवणे, नगरसेवक नितीन पाटील, प्रतिभा चव्हाण, प्रतिभा पवार,पंकज साळुंखे, किरण भैया पाटील यांची उपस्थिती होती.