जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ५२८ रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे लागोपाठ दुसर्या दिवशी पाचशेच्या वर पेशंट आढळून आले असून यात जळगाव, चाळीसगाव, एरंडोल व धरणगावात संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये ५२८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ९४ रूग्ण हे जळगाव शहरातील असून त्या खालोखाल धरणगाव-६३, एरंडोल-५१, अमळनेर-५० त्या खालोखाल जळगाव ग्रामीण- १९, भुसावळ-८, चोपडा-३०, पाचोरा-१७, भडगाव-४८, यावल-८, जामनेर -५०, रावेर -१६, पारोळा-१०, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-१४, बोदवड-३ आणि इतर जिल्हे 2 असे एकुण ५२८ रूग्ण आज आढळून आले आहे.
तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- ३७९१, जळगाव ग्रामीण-७६४, भुसावळ-१०५७, अमळनेर-११३९, चोपडा-१११०, पाचोरा-६१६, भडगाव-६९०, धरणगाव-७२७, यावल-५४८, एरंडोल-८३९, जामनेर-११३६, रावेर-८०१, पारोळा-६११, चाळीसगाव-७५०, मुक्ताईनगर-४७७, बोदवड-२६९, इतर जिल्हे-६६ असे एकुण १५ हजार ३९१ रूग्णांची संख्या झाली आहे.
आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही १५ हजार ३९१ इतकी झाली आहे. यातील १० हजार ६८० इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच ३७५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ६१९ रूग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ०९२ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.