जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रीधुर वाड्यातील सार्वजनिक शौचालया जवळील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन होते. कामाचे भूमिपूजन आटोपल्यानंतर कामाला सुरुवात होत नाही तोच, जेसीबी नाल्यात पडले. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.
या संदर्भात अधिक असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या मुलभूत सुख सुविधा विकास अंतर्गत आज शहरातील रीधुर वाड्यातील सार्वजनिक शौचालया जवळील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे,उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, नगरसेवक भगत बालानी हे उपस्थित होते.
भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. परंतू थोड्याच वेळात जुने बांधकाम तोडतांना जेसीबी नाल्यात जावून पडले. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. दरम्यान, रीधुर वाड्यातील सार्वजनिक शौचालया जवळील पुलाचे काम अंदाजे २५ लाख ६० हजारांचे आहे.