मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर येथील एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेच्या निषेर्धात मोठ्या संख्येने संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकात येऊन निदर्शने केली. परिणामी, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. अखेर रेल्वे रुळावरुन आंदोलक हटत नसल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने अशा घटनांना आळा घालण्यासाठी शांळासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहे, ज्याचे पालन करणे सगळ्यांना बंधनकारक असेल, अशी माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
‘या’ नियमांचे पालन करणे शाळांसाठी बंधनकारक
१. मुंबईतील प्रत्येक शाळेतील महिला स्वच्छतागृहाजवळ महिला कर्मचारी असणे आवश्यक.
२. शाळेत आत्मरक्षाशी निगडीत अभियान सुरू केले जाईल.
३. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्याचे गरजेचे.
४. शाळेत महिला पालकांची आणि शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश
५. प्रत्येक महिन्याला मुलींच्या आरोग्याची तपासणी केली जाणार.