अदानींविरोधात अटक वारंटनंतर अदानी ग्रुपला ३८ हजार कोटींचा दणका !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लाचखोरी आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन कोर्टाने अटक वॉरंट बजावल्याचे तीव्र पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. अदानी समूहाचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी दरडीसारखे कोसळले असून समूहाच्या कंपन्यांचं एकत्रित बाजारमूल्य तब्बल ३८ हजार कोटींनी घटले आहे.

अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स आज ११ टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर ७ टक्क्यांनी घसरून २,०३० रुपयांवर आला आहे. शुक्रवारी बीएसईवर अदानी पोर्ट्सचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरून १०५५.४० रुपयांवर आला. अदानी समूहाला गुरुवारी दुहेरी झटका बसला. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची लाच आणि फसवणुकीचे आरोप आहेत. तसंच, केनियानं अदानी समूहासोबतचे विमानतळ आणि वीज करार रद्द केले आहेत.

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ११ टक्क्यांनी घसरला. कंपनीचा शेअर १०२०.८५ रुपयांवर पोहोचला आहे. तर अदानी ग्रीन सोल्युशन्स लिमिटेडचा शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरून 628 रुपयांवर आला आहे. शुक्रवारी अदानी पॉवरचा शेअर ४ टक्क्यांहून अधिक घसरून ४४५.७५ रुपयांवर आला. अदानी टोटल गॅसचा शेअर ३ टक्क्यांनी घसरला आहे. अदानी विल्मरच्या शेअर्समध्येही ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. एसीसी आणि अंबुजा सिमेंटचे समभाग मात्र सपाट व्यवहार करत आहेत.

Protected Content