पटनायक यांच्या पराभवानंतर निकटवर्तीय व्हीके पांडियन यांची राजकारणातून घेतला संन्यास

भुवनेश्वर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओडिशाचे माजी मुख्यमंत्री, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय बीजेडी नेते व्हीके पांडियन यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी रविवारी एक व्हिडिओ जारी करून याची घोषणा केली. एका व्हिडिओमध्ये ते म्हणाले, मी सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासात माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मला माफ करा. माझ्याविरोधातील प्रचारामुळे बीजेडीचा पराभव झाला तर मला माफ करा.

ओडिशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 78 जागांवर विजय मिळवत पाचवेळा मुख्यमंत्री पटनायक यांची सत्तेतून हकालपट्टी केली आहे. बीजेडीला केवळ 51 जागा मिळाल्या आहेत. पक्षाच्या पराभवाचे कारण पांडियन यांच्यावर ठपका ठेवला जात होता. पक्षातील त्यांच्या वर्चस्वामुळे स्थानिक नेते नाराज होते. वरिष्ठ नेतेही पांडियन यांच्याबद्दल खूश नव्हते. त्याचवेळी पांडियन यांना पटनायक यांचे उत्तराधिकारीही म्हटले जात होते. तामिळनाडूत जन्मलेल्या व्हीके पांडियन यांना भाजपने ओडिशाच्या राजकारणात ‘बाहेरचे’ संबोधले आहे. पांडियन यांनी दिल्लीत शिक्षण घेतले. पंजाब केडरचे आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर एका ओरिया महिलेशी लग्न केल्यानंतर त्याची ओडिशा केडरमध्ये बदली झाली.

 

Protected Content