कांद्यानंतर आता बटाटाही होणार महाग !

Onion Potato 1

 

मुंबई प्रतिनिधी । एकीकडे कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले असतानाच आता बटाट्याचे दरही हळूहळू वाढ असल्याचे समोर येत आहे. कांद्यापाठोपाठ बटाटाही ताटातून गायब होण्याची भीती वर्तवली जात आहे.

रोजच्या जेवणात अनेकांना कांद्याशिवाय पर्याय नसतो. मात्र कांद्याचे दर शंभरीपार गेल्याने बऱ्याच जणांना मन मारुन जेवण बनवावं लागत आहे. कांद्यानंतर नंबर लागतो, तो बटाट्याचा. भाज्या संपल्यावर अडी-अडचणीला धावून येतो तो बटाटा. काही जणांना प्रत्येक भाजीत बटाटे घालण्याची आवड असते. तर वडापावपासून बटाटा भजी आणि दाबेलीपासून सँडविचपर्यंत अनेक फास्टफूडच्या पदार्थांतही बटाटा असतो. मात्र बटाट्यालाही महागाईचा फटका बसलेला दिसत आहे.

यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे आर्थिक समीकरण बिघडवले. त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात चाळीस रुपये किलो मिळणारा कांदा शंभरच्या पार गेला आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने कांद्याचे दर दोन आठवड्यांत 60 रुपयांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामन्यांना सहन करावा लागत असून गृहिणींचे बजट बिघडले आहे.

Protected Content